मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या- देवेंद्र फडणवीस

Featured महाराष्ट्र
Share This:

नागपूर  (तेज समाचार डेस्क): मुंबई आणि पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, या दोन शहरांपलीकडेही महाराष्ट्र आहे. तिकडेही लक्ष द्या, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजातील अनेक घटकांचा विचार केलेलाच नाही. सरकारने त्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. तसेच राज्यातील बेड, व्हेंटिलेटर्स आणि इतर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

ऑक्सिजनची कमतरता हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्य सरकारला ऑक्सिजनच्या वाहतुकीचे व्यवस्थापन जमत नाही. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि निराधार महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत या केंद्र सरकारच्या योजना आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये कोणतीही भर घातलेली नाही. केवळ ते पैसे आगाऊ मिळणार आहेत. त्यामध्ये काही विशेष नाही. लॉकडाऊनची घोषणा करताना ठाकरे सरकारने शेतकरी, आदिवासी, नाभिक वर्ग, बारा बलुतेदार अशा अनेकांच्या तोंडाला केवळ पानं पुसली आहेत, असं फडणवीस म्हणालेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *