नंदुरबार, कोंडाईबारी घाटात लक्झरी बसचा अपघात.

Featured नंदुरबार
Share This:

नंदुरबार, कोंडाईबारी घाटात लक्झरी बसचा अपघात.

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कोंडाईबारी घाटात मोरकरंजा गावाजवळ खासगी लक्झरी बसला अपघात झाला आहे, या अपघातात जवळपास 45 प्रवासी जखमी झाले आहे. तर पाच प्रवासी ठार झाले आहेत. मोरकरंजा गावातील स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलीस यांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यात येत आहे. जळगाव हुन सुरत कडे जाणार्‍या दोन लक्झरी बस एकत्र येत असताना मागून येणार्‍या लक्झरी बसने पुढच्या लक्झरी बसला धडक देत. पुलावरील अरुंद रस्त्यामुळे पुलाचे कठडे तोडून लक्झरी बस दोरीत कोसळल्याने अपघात झाला. अजूनही काही प्रवासी अडकले असल्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे आणि मोरकरंजा गावातील सरपंच सुनील गावित यांच्या मदतीने कटर मशीन द्वारे प्रवाशांना काढण्याचे काम सुरू आहे. कोंडाईबारी ते नवापूर बैठकीदरम्यान महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून रखडल्याने रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *