एल.आय.सी. प्रतिनिधींतर्फे विश्राम दिवस साजरा

Featured नंदुरबार
Share This:

एल.आय.सी. प्रतिनिधींतर्फे विश्राम दिवस साजरा

नंदुरबार ( वैभव करवंदकर ): येथील भारतीय आयुर्विमा महामंडळातील विमा प्रतिनिधींतर्फे संपूर्ण वेस्टन झोनमध्ये आज दि.23 मार्च हा दिवस विश्राम दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यात नंदुरबार शाखेचे प्रतिनिधींनी लियाफी संघटनेतर्फे 23 मार्च विश्राम दिवस म्हणून साजरा केला.

नंदुरबार शाखेतील विमा प्रतिनिधींची लियाफी संघटनेचे अध्यक्ष अनिल संतवाणी यांनी विमा प्रतिनिधी आवाहन केले की, 23 मार्च हा दिवस आपण विश्राम दिवस म्हणून साजरा करत आहोत. यावेळी अनिल संतवाणी म्हणाले की, सर्वांनी संघटीत व्हावे. एकत्र येऊन संपूर्ण विमा प्रतिनिधींची सभासदांची प्रश्न सोडविण्यासाठी न्याय हक्कासाठी एकत्र राहणे गरजेचे आहे. यावेळी नंदुबार शाखेचे शाखाधिकारी जगदीश आर. शिंदे यांना लियाफी संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी उपशाखाधिकारी अक्षय गावित, लियाफी संघटनेचे अध्यक्ष अनिल संतवाणी, उपाध्यक्ष हेमंत शेवाळे, महिला उपाध्यक्ष सुजाता पवार, सचिव अरुण महाजन, कोषाध्यक्ष दुर्गेश राठोड, लियाफी संघटनेचे सदस्य बापू मराठे, धनराज मराठे, जितेंद्र माळी, अश्विन पाटील, संजय वाणी, नदिम काझी, शरद भावसार, महेंद्र जोशी, राजू सोनार, संजय कदम, राजू अनारसे, लक्ष्मण चौरे, पदाधिकारी, सदस्य व विमा प्रतिनिधी उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *