तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी

Featured जळगाव
Share This:

तापी नदीपात्रातून गौण खनिजाची मोठ्या प्रमाणात तस्करी.
तहसीलदार,सर्कल,तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

यावल ( सुरेश पाटील): भुसावळ जवळ असलेल्या तसेच यावल तालुका कार्यक्षेत्रात असलेल्या तापी नदीपात्रातून आणि नदीच्या किनाऱ्या लगतच्या भागातून मशनरीच्या माध्यमातून डबर,मुरूम इत्यादी गौण खनिजाचे उत्खनन करून दररोज हजारो ब्रास विना परमिट गौणखनिज अनधिकृतपणे वाहतूक करून मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे.याकडे संबंधित यावल तहसीलदार यांच्यासह सर्कल, तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप बांधकाम क्षेत्रातील ठेकेदारांकडून आणि रितसर नाममात्र परमिट काढून गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांमधुन होत आहे.
तापी नदीपात्रातून आणि तापी नदीच्या काठावर अधिकृत स्टोन क्रशर उद्योग सुरू आहेत एकूण 11 स्टोन क्रशर धारक आहेत हे सर्व स्टोन क्रशर तालुक्यातील अंजाळे,अकलुद,कासवा शिवारात असल्याची अधिकृत नोंद यावल तहसील मध्ये आहे यातील काही ठराविक आणि अनधिकृत असलेले स्टोन क्रशर उद्योजक मोठ–मोठ्या अत्याधुनिक मशनरी च्या माध्यमातून तापी नदीपात्रातून व तापी नदी लगत किनारपट्टीवरून डबर,मुरूम इत्यादी गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून नाममात्र रॉयल्टी भरून परमिट काढून आपापल्या सोयीनुसार दररोज हजारो ब्रास डबर, मुरूम गौण खनिजाची अनधिकृत वाहतूक व विक्री करून दरमहा कोट्यवधी रुपयांची कमाई करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल रॉयल्टी बुडवित आहे.
स्टोन क्रशर उद्योजक गौण खनिजाचे किती उत्खनन करीत आहे? तापी नदी पात्रात आणि किनाऱ्यालगत 80 ते 90 फूट खोल अंतराचे मोठ–मोठे खड्डे पडले आहेत त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर होणार आहे किंवा नाही?उत्खनन करताना मुरूम, डबर किती ब्रास काढला गेला?आणि प्रत्यक्षात किती ब्रास डबर,मुरूम गौण खनिजाचे परमिट काढून रॉयल्टी भरली गेली आणि दररोज किती ब्रास डबर, मुरुमाची अवैध वाहतूक केली जात आहे याची तपासणी,चौकशी यावल महसूल विभाग का करीत नाही? असे गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अनेक ठेकेदार मध्येच बोलले जात आहे.तरी जिल्हाधिकारी जळगाव, प्रांताधिकारी फैजपूर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आतापर्यंत अवैध गौण खनिज उत्खनन किती प्रमाणात झाले आणि किती ब्रासची परवानगी स्टोन क्रशर उद्योजकांनी काढून रॉयल्टी किती भरलेली आहे याची चौकशी करून त्या काही स्टोन क्रशर उद्योजकांवर दंडात्मक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *