जामनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डिझेल व गॕस दरवाडीच्या विरोधात शहरातील पेट्रोल पंपांवर निदर्शने

Featured जळगाव
Share This:

जामनेर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल-डिझेल व गॕस दरवाडीच्या विरोधात शहरातील पेट्रोल पंपांवर निदर्शने.

यावल (सुरेशपाटील): दि.7जून2021 रोजी प्रदेशअध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले साहेब,जिल्हा अध्यक्ष भैय्यासाहेब संदीपजी पाटील यांच्या सूचनेनुसार जामनेर येथे पेट्रोल पंपावर दरवाढ विरोधात आंदोलन करण्यात आले.यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढीमुळे घोषणा दिल्या त्यामुळे सर्व परिसर दणाणून सोडला.
यावेळी जामनेर तालुकाध्यक्ष शरद पाटील,तोंडापुर येथील जेष्ठ काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नानाभाऊ पाटील,प्रदेश कार्यकारीणी सदस्य-मुलचंदभाऊ नाईक,जेष्ठ नेते मौलानाजी,सेवादल तालुकाध्यक्ष-विजय पाटील,अल्पसंख्याक अध्यक्ष मुसा पिंजारी,तालुका सरचिटणीस राहुलसिंग पाटील,ईश्वरभाऊ तालुका समन्वयक-संदीप पाटील कुर्बानशाह,फ़िरोज खान,प्रफुल्ल पाटील यांच्यासह जामनेर तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *