जळगाव : आढळला 1 करोनाबाधित रूग्ण, रूग्णांची संख्या 58

Featured जळगाव
Share This:

जळगाव : आढळला 1 करोनाबाधित रूग्ण, रूग्णांची संख्या 58

 

जळगाव (तेज़ समाचार प्रतिनिधि ):  ५९ व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून दोन व्यक्तींचे अहवाल तपासण्याची कार्यवाही सुरु आहे तर एक व्यक्तीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.पॉझिटिव्ह आढळलेली व्यक्ती ही भुसावळ येथील ५८ वर्षीय महिला आहे. तर निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये सम्राट कॉलनी, जळगाव येथील करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील पंधरा व्यक्तींचा तर अडावद, ता. चोपडा येथील करोना बाधित व्यक्तींच्या संपर्कातील २५ व्यक्तींचा समावेश आहे. तसेच भडगाव येथील मृत झालेल्या महिलेच्या तपासणी अहवालाचाही समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत करोना बाधित रूग्णांची संख्या ५८ इतकी झाली असून त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण करोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *