जैन हिल्स शाश्वत शेतीचे मूर्तिमंत चित्र : मुख्यमंत्री ठाकरे

Featured जळगाव
Share This:

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक उच्चकृषी तंत्र पुरस्कार सोहळा

जळगाव  –  भवरलालजींनी जैन हिल्स येथे कृषी विश्व उभे केले असून त्यांच्या कृषी तंत्रज्ञानातून साकारलेल भविष्यातील शेती शेतकऱ्यांनी आत्मसात करावीशाश्वत शेतीची प्रेरणा घेऊन जावीजैन हिल्स हे भविष्यातील शेतीचे मूर्तिमंत चित्र होयआपले सरकार हे शेतकऱ्यांना केंद्र बिंदू मानणारे सरकार आहेअसे उद्गार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.

सरकारचा शेतकरी हा केंद्रबिंदू आहेशेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सिंचना करिता पाणीवीज आणि योग्य भाव दिले जातीलभवरलालजी जैन यांच्या वाक्याप्रमाणे ‘जर भारताला बलशाली बनवायचे असेल तर शेती व शेतकऱ्याचा सन्मान करायला हवा‘ तोच सन्मान हे सरकार शेतकऱ्याला मिळवून देणार आहोत असे सांगून जैन हिल्स येथील शेती संशोधन व प्रयोगाबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी कौतुक केलेभवरलालजींच्या परंपरेला अनुसरून पुढच्या पीढीचे कार्य सुरू आहेया परंपरेला महाराष्ट्रात सरकार म्हणून जे जे करता येणे शक्य आहे ते ते आणि जिथे सरकारला पाठिंबा देणे शक्य आहे तो असेल याचे मी वचन देतोअशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात दिलीभविष्यातील शेती ही माती विरहित शेती असेलभवरलालजी जैन हे निश्चयाचे महामेरू होतेभविष्यातली शाश्वत शेती म्हणजे विचार व कृतीची उत्तम सांगड आहे आणि ती भवरलालजी जैन यांनी यशस्वीपणे साकारल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकरी बदलला तर देश बदलेल– शरद पवार

आप्पासाहेब पवार आणि भवरलालजी जैन यांनी आयुष्यभर शेतीसाठी कार्य केलेशेतकऱ्यांना उभे केलेजैन इरिगेशन नेहमीच उच्च तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत देत असतेजैन हिल्स हा शेतकऱ्याला दृष्टी देणारा परिसर आहेशेतकरी बदलला तर गाव बदलेलगाव बदलला तर देश बदलेल त्यासाठी शेतकऱ्यांनी उच्च कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करावाअसे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदराव पवार यांनी केलेवाढत असलेल्या लोकसंख्येचे पोट भरण्याची क्षमता बळीराजामध्ये आहेयासाठी नवनवीन तंत्रज्ञानासह शेती केली पाहिजेमराठवाड्यातला जालना जिल्हा हा तहानलेला जिल्हा आहेपरंतु या परिसरात चव्हाण यांनी आधुनिक पद्धतीने फलोत्पादन व शेती केली व प्रतिकूल परिस्थितीत देखील जिद्द बाळगली तर आपले ध्येय साध्य करता येतेअसे पुरस्कार प्राप्त शेतकरी चव्हाण यांचे त्यांनी कौतूक केले.

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय चव्हाण यांना पद्मश्री डॉआप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार-2018” देऊन गौरविण्यात आलेदोन लाख रूपयेसन्मानचिन्हशालश्रीफळ आणि सौभाग्य लेणे असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पद्मश्री डॉआप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कार-2018 चे मानकरी असलेले प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय भानुदासराव चव्हाण हे 150 एकर शेती कसतातत्यांनी फळबाग व भाजीपाला पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलापूर्णवेळ शेतीमध्ये ते काम करतातत्यांचे 30 सदस्य असलेले कुटुंब आहेवडिलोपार्जित 150 एकरात त्यात त्यांनी सीताफळद्राक्षेडाळिंबपपईतूरमकाज्वारीभाजीपाला या पिकांची लागवड केलेली आहेत्यांच्याकडे आणि कोटी लिटर्स पाण्याची क्षमता असलेले शेततळे असे पाण्याचे स्त्रोत आहेसिंचनासाठी 11 विहिरी आणि सौर ऊर्जेवर चालणारे अश्वशक्तीचे पंपविजेवर चालणारे पंप आहेतत्यांचा यांत्रिकीकरणासह केल्या जाणाऱ्या शेतीवर भर आहेत्यासाठी ट्रॅक्टरब्लोअरएचटीपी पंपपेरणी यंत्ररोटाव्हेटरट्रॉलीमालवाहू पिकअप व्हॅन वगैरे आहेतशेतीमध्ये सेंद्रीय बाबीचा समावेश व्हावा यासाठी ते गोवंश संगोपन देखील करतात.

जैन हिल्स येथे झालेल्या कार्यक्रमास माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवारकृषी मंत्री दादा भुसेकामगार कल्याणमंत्री दिलीप वळसेपाटीलजिल्ह्याचे पालकमंत्री व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार प़डलाव्यासपीठावर पुरस्कार प्राप्त शेतकरी दत्तात्रय चव्हाणसौचंद्रकला चव्हाणजिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटीलमहापौर सौभारती सोनवणेखाउन्मेश पाटीलचिमणराव पाटीलकिशोर पाटीलअनिल पाटीललता सोनवणेसंजय सावकारेमाजी खाईश्वरलाल जैनमाजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथीमाजी खासदार डॉउल्हास पाटील, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरनाधोंमहानोरपुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉएसएसमगरजैन परिवाराचे ज्येष्ठ सदस्य दलिचंद जैनजैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैनसौज्योती जैनउपाध्यक्ष अनिल जैनसहव्यवस्थापकीय संचालक अजित जैनअतुल जैन व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना चव्हाण म्हणाले कीदहा वर्षांपूर्वी मी या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जैन हिल्सला आलो होतोतेथेच मी हा पुरस्कार मिळविणारच असा निश्चय केलात्या दृष्टीने शेतीत काम केलेशेतकरी व गावाची स्थिती ही बदलवली. 2012 पूर्वी गावात 25 एकर फळबाग क्षेत्र होतेते माझ्या प्रयत्नाने 600 एकर वर आणलेरोजगाराचा प्रश्न मिटून गाव आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करू लागलेपाणलोटजलयुक्त शिवार या योजना राबवल्याने फळबागांना अतिरिक्त पाण्याची गरज भागविता आलीअसे मनोगत व्यक्त केले.

मान्यवरांचे जैन परिवारातर्फे स्वागत करण्यात आलेप्रास्ताविक अनिल जैन यांनी केलेजैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन व स्वआप्पासाहेब पवार यांचे शेतीविषयी क्रांतीकारी विचार होतेठिबकसह कृषी तंत्रज्ञानाने शेतकऱ्यांचे जीवनमानात परिवर्तन झालेदोघांनी अवघे आयुष्य शेतीमाती आणि पाणी या कार्यासाठी खर्ची घातलेत्यांच्या या कार्याची प्रेरणा शेतकऱ्यांना मिळावी म्हणून हा पुरस्कार असल्याचे ते म्हणालेगुलाबराव पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना जळगाव मध्ये केळी निर्यातीतून मोठी उलाढाल होतेकेळीत संशोधन वाढावे यासाठी संशोधन केंद्र व त्यासाठी जागा मिळावी याबाबत निर्णय व्हावा अशी विनंती केलीआरंभी दीपक चांदोरकर यांनी गणेशवंदना सादर केलीकार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे तर आभार प्रदर्शन अशोक जैन यांनी केले.

वैशिष्टये:

  • तंत्रज्ञानातून शेती करण्याचा शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यासमोर निर्धार

  • पाच हजाराच्यावर भूमिपुत्रांची उपस्थिती

  • पाच भव्य एलईडी स्क्रीन

  • चित्रफीतीतून दत्तात्रय चव्हाण यांचा शेतीविषयक परिचय

  • मुख्यमंत्री व शरद पवार यांच्या शेजारी पुरस्कारार्थी दत्तात्रय चव्हाण आणि सौचंद्रकला चव्हाण यांना मानाचे स्थान

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *