
कौरव-पांडव यांच्यासारख्या प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप
कौरव-पांडव यांच्यासारख्या प्रवृत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप.
हतनूर पाटबंधारे उपविभागात मोठा भोंगळ कारभार.
भूसंपादित केलेल्या अतिक्रमित हजारो हेक्टर शेतजमिनीत मुरते पाणी.
यावल( सुरेश पाटील): महाभारतात स्वतःच्या स्वार्थासाठी एक इंच सुद्धा जमीन देणार नाही असे कौरव यांनी पांडव यांना सांगितले होते,त्यानुसार जळगांव पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या हतनूर पाटबंधारे विभागात म्हणजे 80 ते 85 किलोमीटर अंतर लांब असलेल्या पाटाचे व हतनुर धरणाच्या देखभाल दुरुस्ती कामां पैकी काही कामे प्रत्यक्ष न करता फक्त कागदावर केली जात असल्याने तसेच हतनुर धरणाजवळील हतनुर उपविभागीय कार्यालयापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावर तापी नदी पात्रात इलेक्ट्रीक मोटारी ठेवून पाईप लाईन च्या माध्यमातून अनधिकृतपणे पाणी उपसा दिवस-रात्र सुरू आहे, पाटबंधारे उपविभागात मोठा भोंगळ कारभारा सोबत पाटाच्या आजुबाजुस भूसंपादित अतिक्रमित शेत जमिनीवर मोठ्या प्रमाणात पाणी मुरत असल्याचे रावेर यावल चोपडा तालुक्यात बोलले जात आहे.
हतनुर पाटबंधारे उपविभागीय अभियंता यांचे कार्यक्षेत्रात यावल,हतनुर,चोपड़ा वगळता इतर चार ठिकाणी उपविभागीय अभियंता जागा व इतर अनेक कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत,तसेच एकूण 4 शाखा अभियंता यांच्या जागासुद्धा रिक्त आहेत,सावदा शाखा कार्यालयात शून्य कर्मचारी असून कार्यालय बंद करण्यात आले आहे,रावेर तालुक्यातील उटखेडा येथे शाखेत फक्त 1 लेबर, रावेर 2 मजूर फक्त, याप्रकारे अधिकारी कर्मचारी कमी असतांना 80 ते 85 किलोमीटर अंतराच्या पाटावरील तसेच हतनूर धरणाचे देखभाल-दुरुस्ती कामांतर्गत म्हणजे गाळ काढणे,भराव दुरुस्ती, गवत काढणे, काटेरी झुडपे तोडणे, रंगरंगोटी, गेट दुरुस्ती, कलरिंग, रस्ता दुरुस्ती इत्यादी कामे होतात कशी याबाबत तसेच विद्यमान अधिकारी कर्मचारी यांच्या कार्यक्षमतेबाबत आणि अनेक कामांबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत यापैकी अनेक अधिकारी कर्मचारी हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी सुद्धा राहतात किंवा नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित केला जात आहे.
याबाबत तसेच 80 ते 85 किलोमीटर लांब अंतराच्या पाटाच्या बांधकामासाठी तसेच आजूबाजूस असलेल्या शेत जमिनी पाटबंधारे विभागाने शासनामार्फत शेतकऱ्यांकडून रितसर भू-संपादित केलेल्या असताना पाटाच्या आजूबाजूस असलेल्या शेकडो एकर शेत जमिनीवर अनेकांनी भूसंपादन शेत जमिनीवर अतिक्रमण करून बागायती पिके तसेच रब्बी हंगाम उत्पादन पाटबंधारे विभागाशी हातमिळवणी करून दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करून घेत असल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये समाजामध्ये तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे याकडे जळगाव पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा यावल रावेर चोपडा या तालुक्यात बोलले जात आहे.
250 कोटीच्या 8 गेटची जबाबदारी चविष्ट चर्चेचा विषय
हतनूर धरणाला एकूण 41 दरवाजे / गेट होते आणि आहेत. परंतु हतनुर धरणात वाढलेला गाळ लक्षात घेता जास्तीत जास्त पाणी साठा कसा वाढविता येईल या दृष्टिकोनातून पाटबंधारे विभागाने पुन्हा आणखी 250 कोटी रुपये खर्च करून नवीन 8 गेट निर्मिती बांधकाम करण्याचे निश्चित केले आहे, हे काम जळगाव येथील एका ठेकेदाराला देण्यात आले असले तरी आता या गेटची बांधकामाची जबाबदारी उपविभागीय अभियंता यांच्याकडे दिल्याने गेल्या महिन्यापासून तापी पाटबंधारे विभागासह जळगांव पाटबंधारे विभाग, जळगाव पाटबंधारे प्रकल्प विभागात संपूर्ण अधिकारी यांच्यामध्ये सविस्तर चर्चा सुरू झाल्या असून 8 गेटचे बांधकाम चांगल्या प्रतीत होणार आहे किंवा नाही याकडे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचे लक्ष वेधून आहे.