AMAZON PRIME वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान, हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी.

Featured जळगाव
Share This:

AMAZON PRIME वरील तांडव वेबसिरीजमध्ये हिन्दु देवदेवतांचा अपमान,हिन्दु जनजागृती समितीने केली बंदीची मागणी.

यावल (सुरेश पाटील): हिन्दु देवदेवतांचा अवमान करून हिन्दुंच्या धार्मिक भावना दुखावणाऱ्या आणी जातीयद्वेष पसरवणाऱ्या तांडव वेबसिरीज वर तात्काळ बंदी आणुन सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावल येथील हिन्दु जनजागृती समितीच्या वतीने केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कडे तसेच यावल येथील संबंधित अधिकाऱ्यांना एका निवेदनाव्दारे केली आहे.दरम्यान आज यावल येथील निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना दिलेल्या निवेदनात हिन्दु जनजागृती समिती दिलेल्या आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अॅमेझॉन प्राईम वर चित्रपट अभीतेने सैफ अली खान, अभीनेत्री डिपंल कपाडीया,मोहम्मद जिशान अय्युब आणी गौहर खान यांची भुमीका असलेली,तसेच अली अब्बास जफर दिग्दर्शित ही वेबसिरीज नुकतीच प्रसारीत झाली आहे.या वेबसिरीजमध्ये कोट्यावधी हिन्दूंचे आराध्यदैवत भगवान शिव आणी भगवान श्रीराम यांच्या विषयी आक्षेपार्ह संवाद दाखवुन त्यांचा अवमान करण्यात आला आहे.तसेच भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या प्रमाणे व्यक्तिरेखा दाखवुन त्यांचाही अपमान केलेला आहे.तसेच जेएनयु मधील देशद्राही घोषणा देणाऱ्या कन्हैयाकुमार आणी तत्सम देश विरोधी घटकांचे उदात्तीकरणही करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसुन येत आले आहे.याची काही उदारणे पुढे देत निवेदनात म्हटले आहे की,या वेबसिरीजच्या एका प्रसंगामध्ये भगवान शिवाची भुमीका करणारे मोहम्मद जिशान अय्युब म्हणतात..आखिर आपको किससे आजादी चाहीए ?त्यावर एक कलाकार म्हणतो … नारायण नारायण प्रभु कुछ किजिएIरामजी के फॉलोअर्स लगातार सोशल मिडीया पर बढते ही जा रहे है Iया वेबसिरीज मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन दाखवण्यात आले असुन पंतप्रधानाच्या मुलाच्या सांगण्यावरून आंदोलनातील तिन मुसलमान युवकांचा एन्काऊंटर करण्यासाठी पोलीसांना सांगीतले जाते.या पैकी दोन मुसलमान युवकांना पोलीस ठार करतात यातुन वर्तमान सत्ताधारी पक्षही मुसलमांनाची हत्या घडवत असल्याचा संदेश देण्यात प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यातील तिसरा मुसलमान युवक उमर खालीद याच्या प्रमाणे व्याक्तीरेखा असलेला दाखवला असुन तो आंदोलन स्थळावरून विवेकानंद विश्वविद्यालयात(व्हीएनयु)जातो . त्याला आंतकवादी असल्याचे सांगत पोलीस उचलुन घेवुन जातात.या प्रसंगात व्हीएनयु हे जेएनयुप्रमाणे दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.या सर्व प्रकारातुन जेएनयु मध्ये झालेल्या देशद्रोही कृत्यांचे एका प्रकारे समर्थन करत,देशद्रोही विद्यार्थ्यावर कसा अन्याय केला गेला,हे दर्शवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.असा विद्वेषीतांडव वेबसिरीजवर तात्काळ बंदी आणावी,तसेच त्यातील सर्व दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असुन या निवेदनावर हिन्दु जनजागृती समितीचे धिरज सुभाष भोळे,प्रशांत जुवेकर, चेतन भोईटे,हेमंत बडगुजर,चंदु बडगुजर,शिवाजी रामदास बारी, धनराज कोळी,लखननाथ यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *