प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्याकडून प्रत्येक व्यवसायिकाची चौकशी

Featured जळगाव
Share This:
प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्याकडून प्रत्येक व्यवसायिकाची चौकशी.
 मुख्याधिकारी नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित.
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): काल दिनांक 7 रविवार रोजी सकाळी फैजपूर उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, यावल तहसीलदार डॉक्टर जितेंद्र कुंवर यांनी संपूर्ण यावल शहरातील व्यवसायिक दुकानदारांकडे तसेच रस्त्याच्या बाजूला बसलेल्या किरकोळ व्यवसायिकांची आणि हात गाडीवरून भाजीपाला व इतर वस्तू विक्री करणाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कोरोनाविषाणू संदर्भात काय काय अडचणी आहेत याबाबत माहिती घेऊन काही सूचना दिल्या.
            यावल शहरातील गवत बाजारापासून प्रत्येक दुकानदाराची, किरकोळ व्यवसायिकाची प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी भेट घेऊन आरोग्य विभागाने तसेच यावल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी तुम्हाला काय काय सूचना दिल्या आहेत किंवा नाही, तसेच आरोग्यविषयक काय तपासणी केली याबाबतची खात्री करून घेतली तसेच दुकानात सर्वांनी, ग्राहकांनी माक्स लावून सोशल डिस्टन्स चे पालन करावे जेणेकरून कोरोना विषाणूची बाधा होणार नाही अशा व इतर काही महत्वाच्या सुचना दुकानदारांना व व्यवसायिकांना दिल्या यावेळी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी बबन तडवी हे आपले वरिष्ठ अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांच्या सोबत उपस्थित नव्हते परंतु त्यांचे नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी रहात नाहीत का ? कोरोना विषाणूच्या महागंभीर परिस्थितीत मुख्याधिकारी हे कोणत्या किंवा खासगी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते किंवा नाही याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या प्राथमिक सुविधांकडे सुद्धा यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांमध्ये बोलले जात आहे, याबाबत प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी आपले लक्ष केंद्रित करून कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *