
राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!
सि़डनी (तेज समाचार डेस्क): कोणत्याही सामन्याची सुरुवात संबंधित दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताने होते. राष्ट्रगीतादरम्यान खेळाडूंचा उर भरुन येतो. अशा वेळेस प्रत्येक खेळाडूला अभिमान वाटतो. राष्ट्रगीतावेळेस मोहम्मद सिराजला अश्रू अनावर झाले.
ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटीझन्सनी या व्हिडीओला भावनिक दाद दिली आहे.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून झाली. मात्र त्याआधी टीम इंडिया काही दिवस ऑस्ट्रेलियात क्वारंटाईन होती. या दरम्यान मोहम्मद सिराजच्या वडिलांचे हैदराबादमध्ये निधन झाले. क्वारंटाईन असल्याने सिराजला वडिलांचे अंत्यदर्शन घेता आले नव्हते.
वडिलांच्या आठवणीत सिराज भावूक झाला असावा, असंही क्रिकेट चाहत्यांकडून म्हटलं जात आहे.
✊ #AUSvIND pic.twitter.com/4NK95mVYLN
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2021