
संगणक टायपिंग अभ्यासक्रमाचा पदभरतीत समावेश
संगणक टायपिंग अभ्यासक्रमाचा पदभरतीत समावेश
यावल (सुरेश पाटील): शासकीय गट अ,व क संवर्ग पदभरती जाहिरातीत शासन मान्यता असलेल्या अभ्यासक्रमाचा संगणक अहर्ता म्हणून उल्लेख करणे आता बंधनकारक आहे या संदर्भात राज्य शासनाने नुकतेच एक परिपत्रक निर्गमित केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून कॉम्प्युटर टायपिंगच्या परीक्षा दर 6 महिन्यांनी घेण्यात येतात.शासनमान्य टंकलेखन संस्थेतून विद्यार्थी इंग्रजी 30/40 आणि मराठी 30/40 हे प्रशिक्षण घेत असतात. या प्रमाणपत्राला शासनाकडून संगणक अहर्ता देखील देण्यात आली तरी काही विभागाच्या पदभरती च्या जाहिरातीत कॉम्प्युटर टायपिंग चा उल्लेख होत नव्हता त्यामुळे पात्र उमेदवारांना आवेदन पत्र भरताना अडचणी येत होत्या. पदभरतीच्या जाहिरातीत संगणक टायपिंग प्रमाणपत्राची (जीसीसी-टीबीसी)मागणी करण्यात यावी,यासाठी महाराष्ट्र राज्य शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन संघटनेकडून शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानंतर सामान्य प्रशासन विभाग माहिती तंत्रज्ञान विभागाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकातून ही मागणी बंधनकारक करण्यात आली. तशा सूचना संबंधित सर्व विभागांना करण्यात आल्या यात शासकीय विभाग कार्यालये,महामंडळे स्वायत्तता संस्था उपक्रम आदींचा समावेश आहे.
आताच्या पुढील परीक्षेकरिता प्रवेश देणे सुरू असून प्रशिक्षणार्थी यांनी आपापल्या जवळील शासनमान्य संस्थेत त्वरित प्रवेश घ्यावा असे महाराष्ट्र राज्य संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद वाणी(रा. यावल)यांनी कळविले आहे