आगामी जि.प.निवडणुकीत समाजसेवा करणाऱ्या उमेदवारानांच प्राधान्य मिळणार

Featured जळगाव
Share This:

आगामी जि.प.निवडणुकीत समाजसेवा करणाऱ्या उमेदवारानांच प्राधान्य मिळणार

आदिवासीच्या विकास कामांना प्राधान्य देणार;शिक्षक सलीम तडवी

यावल (सुरेश पाटील):जिल्हा परिषद जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात जिल्हा परिषद गटात विविध समस्या अडीअडचणी लक्षात घेता आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत नागरिक,मतदार आणि राजकीय नेते मंडळी हे जनतेशी सतत संपर्कात राहणार्‍या आणि खऱ्या समाजसेवकांनाच संधी देणार असल्याचे जिल्हा परिषद गटात आणि राजकारणात समाजा समाजात बोलले जात असून त्यानुसार राजकीय वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.आणि काही इच्छुक पदाधिकारी कार्यकर्ते व नवीन चेहरे सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपापल्या राजकीय सामाजिक कार्यात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहेत.
सावखेडेसिम-हिंगोणा हा जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव होता,आता हा गट अनुसूचित जमाती म्हणून रोस्टर पद्धतीने आरक्षण होणार असल्याने राजकारणात नवीन चेहरा म्हणून परंतु दांडगा जनसंपर्क असलेले यावल येथील बाल संस्कार विद्यामंदिरातील पदवीधर शिक्षक सलीम इस्‍माईल तडवी यांनी सावखेडेसीम-हिंगोणा जिल्हा परिषद गटातील मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचा पहिला दौरा यशस्वीपणे पूर्ण केला.आदिवासीच्या व गटातील सर्व स्तरातील नागरिकांच्या समस्या अडीअडचणी सोडविण्या संदर्भात त्यांना गटातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा मिळत आहे.
सलीम इस्‍माईल तडवी हे मूळचे सावखेडेसिम तालुका यावल येथील रहिवासी आहेत ते यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात गेल्या27वर्षापासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत,खाजगी प्राथमिक सहकारी शिक्षकांच्या पतपेढीत ते विद्यमान संचालक असून माजी अध्यक्ष सुद्धा होते.त्यांच्या पत्नी सावखेडेसिम येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत,त्यांचे वडील इस्‍माईल तडवी हे मुख्याध्यापक होते त्यांचे कुटुंबियांचे शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान असल्याने त्यांचा सर्वस्तरात जाती धर्मात दांडगा जनसंपर्क आहे. सावखेडेसिम ग्रामपंचायत मध्ये त्यांचे कट्टर समर्थक म्हणून सदस्यांचे बहुमत आहे.
गेल्या वर्षी आदिवासी नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या उपस्थितीत सावखेडेसिम येथे प्रतिभाताई शिंदे यांचा वाढदिवस आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला होता त्यात गटातील अनेक आदिवासी बांधवांची उपस्थिती होती त्यामुळे गटात त्यांचा आदिवासी मेळावा घेण्याचे मोठे स्वप्न आहे, आदिवासीच्या घरापर्यंत डांबरी रस्ते तयार करणार असून विविध विकास योजनांच्या माध्यमातून गटाचा सर्वांगिण विकास करणार आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी ते कॅम्प,मेळावे घेणार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सूत्रानुसार वेतनाचा 10 टक्के भाग ते समाजसेवा कार्यात लावत असल्याने त्यांची समाजसेवा त्यांना राजकारणात,जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद सदस्य म्हणून महत्त्वाची ठरणार आहे शिक्षक सलीम तडवी यांना आदिवासी नेत्या प्रतिभाताई शिंदे भाजपचे ज्येष्ठ नेते मंडळी पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत असल्याने त्यांच्या समाजसेवेकडे संपूर्ण राजकारणाचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *