कोरोनाची धास्ती झुगारून नियमांची पायमल्ली करून यावल परिसरात देशी दारूची अवैध विक्री

Featured जळगाव
Share This:

कोरोनाची धास्ती झुगारून नियमांची पायमल्ली करून यावल परिसरात देशी दारूची अवैध विक्री

यावल पोलीस व उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.

यावल (सुरेश पाटील) :यावल येथील चोपडा रोडवर तथा बऱ्हाणपूर–अंकलेश्वर महामार्गाला लागून तसेच जुन्या पेट्रोल पंपाच्या समोर असलेल्या देशी दारूच्या दुकानात अनेक मद्यपी कोरोनाची धास्ती झुगारून आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची व नियमाची पायमल्ली करून आपल्या तोंडावर मुखपट्टी न लावता देशी दारू दुकानात मोठी गर्दी करीत असल्याने यावल शहरासह परिसरात कोरोनाचा प्रादुभाव आणखी जास्त प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या वरील देशी दारूच्या दुकानात कोरोनाची धास्ति झुगारून, सोशल डिस्टन्स खड्ड्यात घालून दुकानाच्या बाहेर अनधिकृतपणे मद्यपी ग्राहकांसाठी देशी दारू बसून पिण्यासाठी एक टेबल खुर्चीची सुद्धा बैठक व्यवस्था केलेली आहे.मद्यपी ग्राहक आपल्या तोंडाला मुखपट्टी न लावता सोशल डिस्टन्स न ठेवता दुकानात गर्दी करीत असतात यामुळे संपूर्ण यावल शहरासह परिसरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फैलावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.दुकानात फक्त देशी दारु क्वारर्टर विक्री पार्सल सुविधा असल्याने ग्राहक दुकानात दारू पितात कशी ?याप्रमाणे यावल परिसरात काही देशी दुकानदारांकडून आपल्या दुकानातून किरकोळ विक्रीसह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात देशी दारुचे क्वारटर्स/खोके सर्रासपणे अनधिकृतपणे विक्री करण्यात येत आहे याकडे सुद्धा यावल पोलीस आणि दारू उत्पादन शुल्क विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे तसेच काही देशी दुकानदार म्हणतात की आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना मासिक हप्ते देत असल्याने आमचे कोणी काहीच वाकडे करू शकणार नाही? असे मद्यपी ग्राहकांमध्येच बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *