आश्रय फाऊंडेशन,कडून महिला कोरोना योद्धांचा सन्मान

Featured जळगाव
Share This:

आश्रय फाऊंडेशन,कडून महिला कोरोना योद्धांचा सन्मान

यावल ( सुरेश पाटील): दि.8मार्च सोमवार रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आश्रय फाऊंडेशन,च्या वतीने महिला कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना मुळे कार्यक्रम आयोजित करण्यास येत असलेल्या अडचणींमुळे प्रातिनिधीक स्वरूपात 12आशा स्वयंसेविकांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कोरोना काळात आपले आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी समर्पित करून आपला जिव धोक्यात घालून करीत असलेल्या मानवजातीची सेवा करणाऱ्या यावल तालुक्यातील आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांचा आश्रय फॉउंडेशन यावल रावेर च्या वतीने जागतिक महिला दिनामिनीत कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.डॉ.सौ. जागृती फेगडे व डॉ.सौ.स्नेहल जावळे यांच्या हस्ते सन्मान प्रमाणपत्र देऊन आशा स्वयंसेविकांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी आश्रय फॉउंडेशन चे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे,डॉ.प्रशांत जावळे उपस्थित होते
पुढील 2 दिवसात तालुक्यातील 100आशा स्वयंसेविका आणि आरोग्यसेविका यांचा गौरव करून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *