मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

Featured जळगाव
Share This:

मा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वैद्यकिय आघाडी यावल च्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

यावल (सुरेश पाटील):  शुक्रवार दिनांक17 रोजी भारताचे लोकप्रिय मा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त यावल येथे भाजपा वैद्यकिय आघाडी, भारतीय जनता पार्टी वैद्यकिय आघाडीच्या वतीने जनतेसाठी मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप कार्यक्रम व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात गरजू रुग्णांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला
या शिबिराचे आयोजन डॉ.कुंदन फेगडे यांच्या आई हॉस्पिटल मधे भुसावळ रोड यावल येथे केले होते.या शिबिराचे उदघाट्न माजी मंत्री तथा आमदार मा श्री गिरीश भाऊ महाजन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे व खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भारतमातेच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्घाटन करण्यात आले
आई हॉस्पिटल भुसावळ रोड यावल येथे डॉ कुंदन फेगडे,डॉ धिरज चौधरी,डॉ.प्रशांत जावळे डॉ.पराग पाटील,डॉ.प्रवीण पाटील यांनी मोफत रुग्ण तपासणी व मोफत औषध वाटप केली या शिबिरामध्ये एकूण १२०० गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
या प्रसंगी जळगाव जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत भाऊ महाजन, हिरालालभाऊ चौधरी,भाजपा रावेर -यावल विधानसभा सहक्षेत्र प्रमुख विलास चौधरी,भाजपा जिल्हा सरचिटणीस हर्षल पाटील, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे,रावेर तालुकाध्यक्ष राजेंद्र लासूरकर, यावल शहराध्यक्ष निलेश गडे, उपाध्यक्ष राहुल बारी, यावल तालुक्याचे भाजपा वैद्यकिय आघाडीचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे,फैजपूर शहराध्यक्ष आनंद नेहेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण बापु चौधरी,युवा मोर्चा शहराध्यक्ष रितेश बारी,सोशल मीडिया रावेर अध्यक्ष मनोज धनगर,ऍड.गोविंद बारी,प्रमोद नेमाडे,सरचिटणीस परेश नाईक,भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस व्यंकटेश बारी,डॉ. धिरज चौधरी डॉ.प्रशांत जावळे डॉ.पराग पाटील डॉ.प्रवीण पाटील भूषण फेगडे संदीप भारंबे इ उपस्थित होते.
याच कार्यक्रमांतर्गतरक्तदान शिबिरासाठी जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढी याचे सहकार्य लाभले व या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले
मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप शिबिरामध्ये एकूण १२०० गरजू रुग्णानानी याचा लाभ घेतला यात डॉ.धिरज चौधरी (MD medicine) व प्रवीण पाटील यांनी हे रक्तदाब,मधुमेह, थायरोईड,छातीचे विकार दम लागणे हृदयाचे विकार,वारंवार खोकला ताप येणे इ.आरोग्य तपासणी केली त्याच प्रमाणे डॉ. प्रशांत जावळे (बालरोग तज्ञ् ) हे लहान मुलांचे आजार डायरिया, पोटदुखणे जंत होणे,बालदमा छातीचे व हृदयाचे आजार, निमोनिया,डेंगू,सर्दी,पडसे,डांग्या खोकला इ, वर आरोग्य तपासणी केली त्याच प्रमाणे डॉ.पराग पाटील (दंत रोग तज्ञ् )हे दात दुखणे, जबड्याला सूज येणे, तोंडाला घाण वास येणे,रूट कॅनॉल ट्रीटमेंट साठी सल्ला इ.वर आरोग्य तपासणी केली व भाजपा वैद्यकिय आघाडीचे यावल तालुका अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी(स्त्री रोग तज्ञ)हे पाळीसंबंधि समस्या,वंद्धत्व,गर्भपिशवीचे विकार,श्वेतपदर,प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात तपासणी इ.आरोग्य तपासणी ही मोफत केली व या सोबत औषधी देखील देण्यात आली
या शिबिरासाठी भारतीय जनता पार्टीचे,डॉ कुंदन फेगडे मित्र परिवार,डॉ. कुंदन फेगडे यांचे संपर्क प्रमुख सागर लोहार,मनोज बारी,विशाल बारी,लीलाधर काटे, आई हॉस्पिटल चे सर्व कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *