पत्रकारांच्या न्याय मागण्याकडे सरकार चे दुर्लक्ष-मनसे ता.अध्यक्ष संदिपसिह राजपूत

Featured जळगाव
Share This:

पत्रकारांच्या न्याय मागण्याकडे सरकार चे दुर्लक्ष-मनसे ता.अध्यक्ष संदिपसिह राजपूत.

यावल (सुरेश पाटील): सरकार पत्रकारांच्या न्याय मागण्याकडे दुर्लक्ष करत असून त्यांच्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्यात अशी मागणी मनसे रावेर ता.अध्यक्ष संदिपसिह राजपूत यांनी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली.

सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्रात दि.7 मे2021रोजी पर्यन्त जवळपास115पत्रकारांचे कर्तव्य बजावत असतांना कोरोनाने बळी गेले.तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना फ्रंट वारीयर म्हणून डॉक्टर आणि पोलीस यांच्याप्रमाणे कोरोनाने मृत झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये देण्याचे वचन हवेतच विरले.व केंद्र शासनाच्या वतीने कोरोनाने मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना5लाख रु.सानुग्रह अनुदान देण्यात यावे ही मागणी सुद्धा अजून मान्य होत नाही.त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी रुग्णालयात उपचारासाठी राखीव बेड, ऑक्सिजन व आदी सुसज्ज यंत्रणा उपलब्ध करून द्यावी.व सर्व वयोगटातील पत्रकारांना लसीकरणाची आवश्यकता असून आपण या महत्वपूर्ण विषयांकित लक्ष केंद्रित करून त्वरित योग्य कार्यवाहीसाठी संबंधितांना आदेश द्यावेत.अशी मागणी मा.मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *