यावल शहरात घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान

Featured जळगाव
Share This:

यावल शहरात घराला आग लागून पाच लाखाचे नुकसान

4 जणांना मोठ्या शिताफीने वाचविले.

पवित्र रात्र ‘शब– ए– मेराज’ रोजी रात्री नऊ वाजता ची घटना.

यावल ( सुरेश पाटील): शहरातील अतिशय वर्दळ असलेल्या मध्यवर्ती खिर्णीपुरा भागातील एका घराला अचानक आग लागली.त्यात संपूर्ण घर जळून खाक झाले. परिसरातील तरुणांनी त्या घरातील चौघांना मोठ्या शिताफीने आणि समयसूचकता बाळगून वाचविले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता आगीत संसारोपयोगी व रोख रक्कम 35 हजार असे एकूण 5लाख रुपयांचे साहित्य जळाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे.
खिर्णीपूरा भागात राहत असलेले शेख चांद शेख कालू व त्यांचा मुलगा शेख भिकारी शेख चांद हे फळ विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार दिनांक अकरा रोजी संध्याकाळी व्यवसाय करून ते घरी परतले होते मुस्लिम समाज बांधवांची पवित्र अशी रात्र ‘शब- ए– मेराज’ असल्याने कुटुंबातील सदस्य नमाज पठणासाठी गेले होते. घरात महिला आणि 2 लहान बालके होती, रात्री 9 वाजेच्या सुमारास या घराला अचानक शॉर्टसर्किटमुळे आग लागली, घरातील3खोल्यामुळे पुढील खोलीत आग लागल्याने लवकर समजले नाही मात्र अचानक आगीने रौद्ररूप धारण करताच नुरजहाँबी, सबनूरबी आणि दोन लहान बालके असे 4 जण घरात अडकले होते. ही गंभीर परिस्थिती पाहून या भागातील शेख इम्रान शेख बिस्मिल्ला,याकूब गुलाम अहमद व इलियास खान यांनी घराची एका बाजूची भिंत तातडीने तोडून चौघांना सुखरूप बाहेर काढले तोपर्यंत आगीने घरातील सुमारे 5 लाख रुपयाच्या संसारोपयोगी वस्तूची, साहित्याची राख केली. या घटनेत कपाटात ठेवलेले 35 हजार 700 रुपयांची रोख रक्कम देखील जळाली खिर्णीपुरा भागातील तरुणांनी जीव धोक्यात घालून आग विझवली नसती तर ती इतरत्र आजूबाजूला आग पसरून मोठे नुकसान झाले असते असे सुद्धा प्रत्येक प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *