काँग्रेस पक्षाच्या विमुक्त भटक्या जाती,जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पदी-मदनभाऊ जाधव यांची निवड

Featured जळगाव
Share This:

काँग्रेस पक्षाच्या विमुक्त भटक्या जाती,जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पदी-मदनभाऊ जाधव यांची निवड.
(१’लै.कृषी दिनी प्रदेशाध्यक्ष-नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार)

 

यावल   (सुरेश पाटील): राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष,बंजारा व भटक्या-विमुक्त समाजाचे युवा नेते,समाजसेवक तथा जामनेर,जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मदनभाऊ जाधव यांचे बंजारा व भटक्या-विमुक्त समाजातील कार्याची दखल घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष-मा.नानाभाऊ पटोले यांनी हरितक्रांतीचे प्रणेते,महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार-कै.वसंतरावजी नाईकसाहेब यांच्या १०८’व्या जयंतीनिमीत्त आयोजित एका कार्यक्रमात नियुक्तीपत्र देऊन निवड केली.
यावेळी,अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सरचिटणीस-राजीवजी शुक्ला,प्रदेश कार्याध्यक्ष-चंद्रकांत हंडोरे,उपाध्यक्ष-संजयभाऊ राठोड,मोहन जोशी,हुसेन दलवाई,सचिव-संजय झाडे पाटील,मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष-झिया उल रहेमान,सरचिटणीस-डॉ.गजानन देसाई,युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष-मिलींद खराडे,प्रदेश सरचिटणीस-देवानंद पवार,मधु चव्हाण,प्रमोद मोरे,शाह आलम शेख,प्रदेश प्रवक्ता-अतुलजी लोंढे,ठाणे जिल्हाध्यक्ष-राकेश पाटील,काँग्रेस नेते-मोईन काझी,भारत राठोड,राजाराम पवार,लक्ष्मण म्हस्के,डॉ.प्रियंका राठोड,इ.मान्यवर उपस्थित होते.
मदनभाऊ जाधव हे गेल्या १०-१५ वर्षापासून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात.मदनभाऊ हे कल्याण येथील तिज महोत्सव कृती समितीचे अध्यक्ष असून या समितीच्या वतीने त्यांनी कल्याण व मुंबई परिसरासह सर्व बंजारा व भटक्या-विमुक्त समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करीत असतात आणि मदनभाऊ यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम दरवर्षी अतिशय जोरदार होत असतो.या कार्यक्रमाची ओळख महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आज बंजारा समाजाचा तिज सण प्रसिद्ध झालेला आहे.
याचबरोबर मा.मदनभाऊ जाधव हे बंजारा भटक्या-विमुक्त समाजाच्या विविध अडी अडचणी व समस्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नरत असतात आणि त्या सोडविल्याशिवाय ते शांत बसतच नाही.
जामनेर तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून मदनभाऊ जाधव यांची ओळख आहे.ते तालुक्यातील सर्व समाजात परिचीत आहेतच परंतु,विविध कार्यक्रमानी त्यांची ओळख अजून घट्ट झालेली आहे.त्यामध्ये त्यांचा दरवर्षी होणाऱ्या वाढदिवसानिमीत्त विविध प्रकारचे सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक व आरोग्य शिबीर असे कार्यक्रम ते घेत असतात.
म्हणूनच मदनभाऊ जाधव यांनी केलेल्या विविध प्रकारच्या सामाजिक कार्याची ओळख आज काँग्रेस पक्षाने घेतली असून मदनभाऊ जाधव यांच्या निवडीने जामनेर तालुक्यासह,संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बंजारा व भटक्या-विमुक्त समाजामधे आनंद झाला आहे.
मा.मदनभाऊ जाधव यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या भटक्या-विमुक्त सेलच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष-आत्मारामभाऊ जाधव,राष्ट्रीय उपाध्यक्ष-विरेंद्रजी रत्ने,अमृतजी मेढकर,आत्मारामजी जाधव(गुजरात),राष्ट्रीय महासचिव-वाल्मिकजी पवार,राष्ट्रीय सरचिटणीस-अनिलभाऊ पवार,राष्ट्रीय कोषाध्यक्ष-राजेशजी नाईक,राष्ट्रीय सचिव-गणपती राठोड,माजी.प्रदेशाध्यक्ष तथा जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष-अशोकभाऊ चव्हाण,प्रदेश काँग्रेस कार्यकारीणी सदस्य-मुलचंदजी नाईक,जळगाव जिल्हाध्यक्ष-ॲड.संदिपभैय्या पाटील,जामनेर तालुकाध्यक्ष-शरदजी पाटील,माजी तालुकाध्यक्ष-शंकरभाई राजपूत,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष-गजानन जाधव,प्रदेश कार्याध्यक्ष-आनंदभाई चव्हाण,प्रदेश उपाध्यक्ष-विलास जाधव,शेषरावदादा आडे,प्रदेश सरचिटणीस-भारतभाऊ राठोड,प्रदेश सल्लागार-शंकरभाई पवार,प्रदेश सहसंघटक-भास्कर आडे,प्रदेश प्रवक्ता-सतिषजी राठोड,प्रदेश समन्वयक-रवि राठोड,सोशल मिडिया प्रमुख-मच्छिंद्र चव्हाण,प्रदेश सचिव-सुरेश पवार,मुंबई अध्यक्ष-रोहित राठोड,कल्याण तालुकाध्यक्ष-अशोकभाऊ राठोड,तालुका सचिव-केवलसिंग तंवर,कल्याण शहराध्यक्ष-ज्ञानेश्वर राठोड,जामनेर तालुका काँग्रेस पदाधिकारी-मा.ज्योत्सनाताई विसपूते,डॉ.ऐश्वरी राठोड,संजय राठोड,यांच्यासह समाजातील विविध सामाजिक,शैक्षणिक,राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *