दारूड्यांनी रात्रीच्या वेळी ‘या’ अभिनेत्रीचा केला पाठलाग अन्…

Featured इतर
Share This:

नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क):  राजधानी दिल्लीमध्ये एका टीव्ही अभिनेत्री सोबत काही दारुड्यांनी गैरप्रकार केल्याची घटना समोर आली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात दारुड्यांनी अभिनेत्रीचा पाठलाग करत तिची छेड काढली. अभिनेत्री घरी पोहचताच संबंधीत आरोपींनी गाडीतून खाली उतरुन तिला गलिच्छ शिवीगाळ देखील केली.

टीव्ही अभिनेत्री प्राची तेहलान मंगळवारी रात्री आपल्य पतीसोबत घरी येत असताना काही दारुड्यांनी त्यांचा पाठलाग केला. नंतर अभिनेत्री तिच्या घरी पोहचताच आरोपींनी गाडीतून खाली उतरुन तिला गलिच्छ शिवीगाळ देखील केली. प्राची तेहलानने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्या चार आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना जेव्हा घडली तेव्हा सर्व आरोपी दारुच्या नशेत होते.

दरम्यान, प्राची ही आपल्या पतीसोबत नातेवाईकांच्या कडून आपल्या घरी परतत असताना हा गैरप्रकार घडला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *