धुळे: 2 करोना संशयित रूग्णांचा मृत्यू- अहवाल प्रलंबित

Featured धुळे
Share This:

धुळे (तेज समाचार डेस्क): धुळे जिल्ह्यात गेल्या चार दिवसात करोनाबाधितांची संख्या चिंता वाढविणारी असून आज हिरे शासकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या दोन करोना संशयित रूग्णांचा आज मृत्यू झाला आहे.  दोघांचेही अहवाल प्रलंबित असून अहवाल आल्यानंतरच ते करोनाबाधित आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. मृत करोना संशयितांचा स्वॅब अहवाल घेण्यात आला आहे. आतापर्यंत धुळ्यात ५३६ जणांचे अहवाल घेण्यात आले आहेत. दैनंदिन अहवाल घेतलेल्यांपैकी ५९ अहवाल प्रलंबित आहे. धुळे जिल्ह्यात करोनाग्रस्तांची संख्या १९ झाली असून या दोन संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास ही संख्या २१ वर जाण्याची शक्यता आहे.आतापर्यंत धुळ्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान धुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या गेल्या चार दिवसापासून वाढत असून मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. आज सकाळी तीन रूग्ण आढळून आल्याने आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. घरीच थांबावे. अनावश्यक गर्दी करू नका. गर्दी केल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू शकतो. त्याचा ताण आपल्या आरोग्य यंत्रणेवर पडेल. त्यामुळे सर्व धुळे जिल्हावासीयांनी घरीच राहून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *