
दिल्लीत गेल्या दशकभरातील सर्वाधिक गारठ्याची नोंद
दिल्लीत गेल्या दशकभरातील सर्वाधिक गारठ्याची नोंद
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): : दिल्लीत नोव्हेंबर महिन्यात गेल्या दशकभरातील सर्वाधिक गारठ्याची (highest hailstorm) नोंद झाली. यंदाच्या मोसमात नोव्हेंबर महिन्यात कमाल तापमान १० अंश सेल्सियसच्या जवळपास राहीले. एरवी राज्यात नोव्हेंबर महिन्याचे कमाल तापमान १२ ते १३ अंश सेल्सियस असते. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार १ ते २९ नोव्हेंबर पर्यंत शहरात कमाल तापमान सरासरी १० अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. गेल्या दहा वर्षातील हे सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. आज सोमवारी राज्यातील तापमान ७ अंश सेल्सियसच्या जवळपास राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. २३ नोव्हेंबरला राजधानीतील कमाल तापमान ६.३ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले होते. हे तापमान नोव्हेंबर २००३ नंतर आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान होते. २००३ मध्ये ६.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली होती.
२०१९ मध्ये नोव्हेंबर महिन्यात राज्यातील कमाल तापमान १५ अंश सेल्सियस होते. २०१८ २०१७ तसेच २०१६ मध्ये कमाल तापमान अनुक्रमे १३.४ तसेच १२.८ अंश सेल्सियश नोंदवण्यात आले होते. काश्मीर मधील गुलमर्ग सह इतर भागात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात थंडीची लाट आली आहे. पश्चिम विक्षोभामुळे उत्तर भारतातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाली आहे. थंड हवेचा वेग उत्तरेच्या दिशेने असल्याने मैदानी भागातील थंडीत वाढ झाली आहे. 3 डिसेंबर पर्यंत थंडी कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. डोंगराळ भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मात्र दिल्लीसह उत्तर भारतातील गारठ्यात कमालीची वाढ झाली आहे.