
शिरपूर येथे चौधरी गल्ली वरचेगाव श्री.गुरुदेव दत्त जयंती जन्मोत्सव साजरा
शिरपूर ( मनोज भावसार ). मंगळवार दि.२९ रोजी शिरपूर येथील चौधरी गल्ली वरचेगाव श्री.दत्त मंदीरात श्री.गुरुदेव दत्त जयंती जन्मोत्सवनिमित्त सकाळी १० वा.महाअभिषेक व दुपारी जन्मोत्सव साजरा करण्यात आला तसेच रात्री ९ वा.सांप्रदायीक भजनाचा श्री.शिवलाल महाराज दत्त भजनी मंडळ चौधरी गल्ली वरचेगाव शिरपूर यांनी आयोजन करुन धार्मिक वातावरणात अभंग, भावगीत, गवळणांचा आनंद घेतला यात श्री.खंडेराव महाराज मंदीर भजनी मंडळ शिरपूर,श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरचेगाव शिरपूर,श्री.दोधेश्वर भजनी मंडळ दहिवद, श्री.संत सावता माळी भजनी मंडळ वरवाडे, मारुती भजनी मंडळ उंटावद, श्री.माऊली भजनी मंडळ बाळदे, पवनपुत्र भजनी मंडळ साकवद, वनावल भजनी मंडळ, भाटपुरा भजनी मंडळ, नवयुवक भजनी मंडळ जैतपूर, संकटमोचन हनुमान भजनी मंडळ वाल्मिकनगर शिरपूर, माऊली भजनी मंडळ कमखेडा,या सर्व शिरपूर तालुक्यातील भजनी मंडळांनी भजनाचा आनंद घेतला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन श्रीगुरुदत्त मंदीराचे सेवक श्री.प्रकाश महारु चौधरी,रविंद्र महारु चौधरी परिवार तसेच चौधरी गल्ली मित्र परीवारातर्फे साबुदाणा प्रसाद वाटप करण्यात आला.