कोरोना : कैद्यांना पॅरोलवर सोडा – सर्वोच्च न्यायालय

Featured देश
Share This:

नई दिल्ली (तेज समाचार डेस्क): देशामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचे आदेश दिले आहेत. तुरूंगातील गर्दी कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेश दिले आहेत.

प्रत्येक राज्य सरकारने एक कायदा सचिव आणि राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासह एक उच्चस्तरीय समिती निर्माण करावी. या समितीद्वारे पॅरोल किंवा अंतरिम जामिनावर कोणत्या गुन्ह्यातील कैद्याला सोडले जाऊ शकते हे ठरवावे, असेही निर्देश सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक राज्याला दिले आहेत.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *