जळगाव जिल्ह्यात आढळून आलेल्या पहिल्या कोरोना बाधित रूग्णाचा 15 दिवसानंतर घेण्यात आलेला दुसरा नमुना तपासणी अहवाल “निगेटिव्ह” आला आहे

Featured जळगाव
Share This:
जळगाव (तेज समाचार डेस्क) : त्यामुळे या रूग्णास उद्या कोविड 19 रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.
आतापर्यंत प्राप्त झालेल्या सर्व  तपासणी अहवालानुसार सध्या जळगाव जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही. ही अतिशय महत्वाची व सुखद घटना आहे.
अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रणेच्या अथक मेहनतीबरोबरच जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी नागरिकांमध्ये केलेल्या जनजागृतीचे व नागरिकांच्या सहकार्याचे हे फळ आहे.
यापुढील लाॅकडाऊनच्या काळातही नागरिकांनी संयम राखून घरातच रहावे. व आपला जिल्हा कोरोना मुक्त राहण्यासाठी आपले बहुमुल्य योगदान द्यावे. असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *