
तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न शाळा या विषयावर दोन दिवसीय ऑनलाइन कार्यशाळा संपन्न
नंदुरबार( वैभव करवंदकर ): कोविड़-19 च्या महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्य, स्वच्छता, पोषण ,आहार ,तणाव निर्मूलन आणि तंबाखू मुक्ती या विषयावर ऑनलाइन जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय कार्यशाळा शालेय शिक्षण विभाग सलाम मुंबई फाउंडेशन आरोग्य विभाग राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आणि नवनिर्माण सर्व समाज विकास संस्था नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड सह्याद्री यांच्या मार्गदर्शनाखाली 13 ऑक्टोंबर व 14 ऑक्टोबर या कालावधीत झूम मीटिंग च्या साह्याने तंबाखूमुक्त आरोग्यसंपन्न या विषयावर ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली .
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. रोकडे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी माध्यमिक मच्छिंद्र कदम सलाम मुंबई फाऊंडेशन चे उपाध्यक्ष राजश्री कदम व्यवस्थापक कल्पना पिलई सह व्यवस्थापक दीपक पाटील मुख्य प्रशिक्षक आदेश नांदवीकर तसेच जिल्ह्याचे सर्व गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख रवी गोसावी नवनिर्माण संस्था अध्यक्ष हे जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उपस्थित होते तसेच मुख्याध्यापक तंत्रस्नेही शिक्षक तालुकास्तरीय कार्यशाळेत उपस्थित होते. प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. रोकडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले की तंबाखू मुक्त शाळा अभियानात नंदुरबार जिल्ह्याने अत्यंत सुंदर सर्व शिक्षकांनी केले असून यासाठी नवनिर्माण संस्था सलाम मुंबई फाउंडेशन च्या टीमने देखील काम केले आहे. आमच्या शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतलेली आहे म्हणूनच आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शाळा या तंबाखूमुक्त निकष पूर्ण करून संपूर्ण जिल्ह्यातील शाळा तंबाखू मुक्त शाळा झाले आहेत. त्याच्यात सातत्य राहावे यासाठी आमचे सर्व शिक्षक प्रयत्न करत आहेत त्या सर्वांचा मी अभिनंदन करतो आणि सातत्य टिकवण्यासाठी आमच्या कोणते प्रकारचे सहकार्य लाभलं तरी आम्ही निश्चित करू असं आव्हान करीत शुभेच्छा दिल्या.
या कार्यशाळेत सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रवी गोसावी यांनी केले तर पी. टी. च्या साह्याने सलाम मुंबई फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक आदेश नांदवीकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या दोन दिवसीय कार्यशाळेत शिक्षण विभाग आरोग्य विभाग सलाम मुंबई फाउंडेशन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समिती सदस्य नवनिर्माण संस्था कर्मचारी सलाम मुंबई फाऊंडेशन चे रुची पाटकर संदेश आदींनी मोलाचे सहकार्य लाभले.