तिरुपतीनगर खुल्या जागेवरील महिला बगीचा कंपाउंड भिंत अपूर्ण

Featured जळगाव
Share This:

तिरुपतीनगर खुल्या जागेवरील महिला बगीचा कंपाउंड भिंत अपूर्ण.

महिलांची छेडखानी करण्यासाठी ठेकेदाराने सोडली पळवाट.

न.पा.मुख्याधिकारी यांच्यासह नगरसेवकांचे दुर्लक्ष.

यावल (सुरेश पाटील): तिरुपतीनगर मधील महिला गार्डनचे संरक्षण भिंतीचे काम दक्षिण बाजूने अपूर्ण ठेवल्याने ठेकेदाराने संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले? बांधकामास कोणी विरोध केला आहे का?तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून ठेकेदाराने किंवा नगरपालिका मुख्याधिकारी/ नगरसेवकानी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई का केली नाही? इत्यादी अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून महिला बगीच्याचे संरक्षण भिंतीचे काम तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
शहरातील तिरुपतीनगर परिसरातील खुल्या जागेवर/ओपन स्पेस जागेवर यावल नगरपरिषदे मार्फत महिलांसाठी बगीच्या बांधकाम करण्यात येत आहे या खुल्या जागेला चारही बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात आली बगीच्या साठी स्वतंत्र प्रवेश द्वार ठेवलेले असताना सुद्धा दक्षिणे कडील रस्त्यावर एक भला मोठा ट्रक बगीच्यात प्रवेश करू शकतो एवढी मोकळी जागा सोडून संरक्षण भिंत कंपाऊंड अपूर्ण ठेवल्याने(रिकाम टेकड्यांना काही तरुण आणि पुरुषांना)भविष्यात महिलांच्या बगिच्यात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेडखानी करण्यासाठी(प्रेम प्रकरणासाठी लव जिहाद लॅण्ड जिहाद म्हणून)जागा मोकळी/पळवाट ठेवण्यात आली असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात असून याकडे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी व नगरसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे सदरच्या ठेकेदाराने कंपाऊंड/संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले बांधकामास विरोध करणाऱ्या विरुद्ध आणि शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल का केला नाही? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल नगरपरिषदेने ठेकेदारामार्फत पोलीस बंदोबस्तात सर्व समाज हितासाठी महिला बगीचा कंपाउंड चे काम पूर्ण करावे अन्यथा तिरुपतीनगर परिसरातील सर्व स्तरातील महिला नागरिक मोठे आंदोलन छेडणार असल्याचे सुद्धा बोलले जात असल्याने कायदा व सुव्यवस्था शांतता तसेच जातीय सलोखा कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित सर्व यंत्रणेने मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे महिला बगीच्या कंपाऊंडचे काम तत्काळ कोणताही बदल न करता पुर्ण करावे असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *