
पाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये
पाणीपुरवठा योजनेत शिवसेनेच्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी घेऊ नये.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील.
यावल (सुरेश पाटील): यावल रावेर तालुक्यातील विविध 14 पाणीपुरवठा योजना या पाणीपुरवठा मंत्री तथा पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये तसेच चोपडा विधानसभा मतदार संघाच्या शिवसेना आमदार सौ. लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे योजना मंजूर झाल्या आहेत परंतु शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय भाजपाचे जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी व्हाट्सअप ग्रुप वर व इतर माध्यमातून खोट्या बातम्या पसरवून प्रसिद्धी मिळविण्याचा केविलवाणी प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी पत्रकार परिषदेत लेखी निवेदनाद्वारे केलेला आहे.
दिनांक 24 रविवार रोजी संध्याकाळी 5 वाजता यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते पुढे म्हणाले की आगामी जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तसेच जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील यांच्याकडून गेल्या चार वर्षात एकही काम न झाल्याने ते शिवसेनेने केलेल्या कामाचे श्रेय नागरिकाना खोटी माहिती देऊन आपल्याकडे घेत आहेत.रवींद्र पाटील हे चार वर्षांपूर्वी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेस त्यांचे पालकमंत्री असतानासुद्धा त्यांना पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणता आल्या नाहीत.आणि आता खोटी प्रसिद्धी मिळवून घेत आहेत.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी म्हटले आहे की, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात जळगाव जिल्ह्यातील अपूर्ण व प्रस्तावित नवीन पाणीपुरवठा योजनांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली, या बैठकीत शिवसेना आमदार सौ. लताताई सोनवणे तसेच माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी चोपडा मतदार संघातील चोपडा व यावल तालुका कार्यक्षेत्रात विविध 34 योजना जल जीवन मिशन अंतर्गत प्रस्तावित करणे व लासुर व 8 गांवे धानोरा,अडावद येथील रखडलेल्या योजनांबाबत प्रश्न उपस्थित केला. यावल तालुक्यातील पिळोदा खु.थोरगव्हाण,डांभुर्णी,इचघेड़ा, चिंचोली,दहिगांव,साकळी,शिरसाड, मनवेल,वाघोदे,गिरडगाव,शिरागड, नायगाव,वाघझिरा,डोणगाव,उंटावद, कोरपावली इत्यादी गावांच्या पाणीपुरवठा योजना जलजीवन योजनेअंतर्गत मंजूर कराव्यात असे 13 एप्रिल 2020 रोजी जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांना लेखी पत्र व्यवहार केला असता मंत्रीमहोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना तीनही गांवाचे पाणीपुरवठा योजनांचे अंदाजपत्रक मंजुरीसाठी त्वरित मुख्य अभियंता जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत शासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले होते,आणि आहेत,त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेल्या या गावांचा पाणीपुरवठा योजनांना आता चालना मिळणार आहे.
यावेळी पाचोरा येथील आमदार किशोर आप्पा पाटील, जल जीवन मिशन च्या अभियान संचालक श्रीमती आर,विमला,पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गजभिये,जिवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर,कक्ष अधिकारी श्रीमती सरोज देशपांडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भामरे,नन्नवरे, कार्यकारी अभियंता निकम यावेळी उपस्थित होते.
मात्र यावल तालुक्यातील चोपडा यावल विधानसभा मतदार संघातील या योजना मंजुरी आम्ही आणली असे साकळी -दहिगांव गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा परिषद सभापती रवींद्र उर्फ छोटू पाटील हे व्हाट्सअप व काही प्रसिद्धी माध्यमातून नागरिकांना खोटी माहिती पुरवून प्रसिद्धी करून घेत आहेत,या कामासंदर्भात त्यांनी कोणते आणि कुठे पत्रव्यवहार केले? व त्या कामांच्या मंजुरीसाठी कसा पाठपुरावा केला? याबाबत त्यांनी त्याचा खुलासा पुराव्यानिशी करावा असे सुद्धा शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी म्हटले आहे.