
अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेवर प्रा. खैरनार यांची निमंत्रित विश्र्वस्त पदी नेमणूक झाल्याने सत्कार करण्यात आला
अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेवर प्रा. खैरनार यांची निमंत्रित विश्र्वस्त पदी नेमणूक झाल्याने सत्कार करण्यात आला
तळोदा (वैभव करवंदकर ): येथील प्रा.युवराज खैरनार यांची अखिल भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेवर निमंत्रित विश्र्वस्त पदी नेमणूक झाल्याने तळोदा शिंपी समाज नवयुवक मंडळाने टेलर्स डे अवचित साधून प्रा. यशवंत खैरनार यांच्या सत्कार केला. तसेच तळोदा शहरातील शिंपी समाजातील शिवणकर्मींना शिवणकामाच्या साहित्याचे किट देऊन सत्कार केला. 🌹 दिनांक 28 फेब्रुवारी हा दिवस जागतिक टेलर्स डे म्हणून साजरा करण्यात येतो. शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बाबा बागुल व सरकार्यवाह संजय खैरनार यांच्या सूचनेनुसार तसेच भाऊसाहेब गोपाळराव शिंपी तळोदा( माजी समाजाध्यक्ष व विद्यमान विश्वस्त,मध्यवर्ती संस्था)यांच्या प्रेरणेतून आणि प्रा.युवराज खैरनार (माजी सरकार्यवाह व विद्यमान निमंत्रित विश्र्वस्त) यांच्या मार्गदर्शनानुसार तळोदा (जि.नंदुरबार) येथे टेलर्स डेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमात गावातील साधारण 30 शिवणकर्मींचा शिवणकामाच्या साहित्याचे किट देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी प्रा.युवराज खैरनारांनी उपस्थित शिवणकर्मींना “टेलर्स डे “विषयी सविस्तर माहिती दिली.मध्यवर्ती ने 21 शिलाई मशिन करता करता 65 शिलाई मशीनाचे वाटपाविषयी माहिती दिली. तद्नंतर भाऊसाहेब गोपाळराव शिंपी यांच्या संदेशाचे वाचन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक नवयुवक मंडळाचे अध्यक्ष रूपेश शिंपी व सहकारी आणि जिल्हा नवयुवक मंडळाचे पदाधिकारी लक्ष्मीकांत बोरसे, सुनिल शिंपी, किरण शिंपी आदींनी परिश्रम घेतले.