अमृता फडणवीस यांचा ठाकरे सरकारला सल्ला

Featured मुंबई
Share This:

मुंबई (तेज समाचार डेस्क):लशीची कमतरता आहे, 15 ते 20 दिवसात लस उपब्लध होतील. तसेच मी स्वत: लवकरच व्हॅक्सीन घेणार आहे. कलाकारांकडे आपण लक्ष द्यायला हवं. सर्व गोष्टी करायला पाहिजे, सरकार करत नसेल तर त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी म्हटलंय.

पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावं, त्यांना प्रवासांचे पासेस मिळायला हवेत, प्रत्येक व्यक्तींना लस घ्यायला हवी, असंही अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. अमृता फडणवीस यांनी आज धारावीमध्ये रेशन किटचं वाटप केलं. यावेळी त्या बोलत होत्या.

धारावी जनतेनं शक्तिशालीरीत्या कोरोनाशी झुंज दिली. धारावीतील लोकांनी एकत्रित येऊन नियमांचं पालनं केलं, त्यामुळे कोरोना आटोक्यात आल्याचंही अमृता फडणवीस यांनी अधोरेखित केलंय.

ज्यांचं हातावर पोट आहे, त्यांना मदतीची गरज आहे, त्यामुळे ज्याला शक्य आहे, त्यांनी मदत करणं गरजेचं आहे. कलाकाराला खूप स्वाभिमान असतो, अशा दिवसात कलाकार आणि मुख्यतः बॅक स्टेज कलाकारांना याचा फटका बसलाय. आमच्या फाऊंडेशनच्या मार्फत कलाकारांना शक्य ती मदत करीत आहोत. छोट्या कलाकारांचे पेमेंट अडकले आहेत. मोठ्या कलाकारांना पेमेंट मिळतो. मात्र छोट्या कलाकारांना मदत मिळाली पाहिजे, असंही अमृता फडणवीस म्हणाल्यात.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *